भगवंत भक्त सौ. अरुणा ( कोरे )थोरात यांचे निधन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भगवंत भक्त तथा पत्रकार विजय अंबादास थोरात (कोरे) यांच्या मातोश्री सौ. अरुणा अंबादास थोरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने थोरात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. अरुणा थोरात या वारकरी संप्रदायातील निष्ठावान होत्या. श्री भगवंतांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. धार्मिक वृत्ती, दानशूर स्वभाव, धाडसी व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक जाणिवा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी आपल्या कुटुंबावर वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजविले.
बार्शीतील प्रसिद्ध श्री दत्त ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून गेल्या सुमारे साठ वर्षांपासून उभारण्यात आलेल्या व्यवसायाच्या वाटचालीत त्यांची प्रेरणा आणि मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे कुटुंबाच्या व्यवसायाने प्रगती केली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने थोरात कुटुंबीयांची मोठी हानी झाली आहे.




