बुलढाणामहाराष्ट्र

एमएसएमई उद्योजकांसाठी भारतीय डाक विभागाची पार्सल सेवा ठरतेय वरदान !

वाजवी दरात देशभरासह परदेशातही उत्पादने पोहोचविण्याची संधी महिला बचत गट आणि ई-कॉमर्स व्यावसायिकांनाही लाभ

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बुलढाणा : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक (MSME), महिला बचत गट तसेच ई-कॉमर्स व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री देशभरात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करण्याची संधी भारतीय डाक विभागाच्या आधुनिक पार्सल सेवेमुळे उपलब्ध झाली आहे. वाजवी दर, विश्वासार्ह सेवा आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले व्यापक वितरण जाळे यामुळे उद्योजकांसाठी डाक विभागाची पार्सल सेवा प्रभावी वाहतूक व वितरणाचे माध्यम ठरत आहे.

स्थानिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभागाने पार्सल सेवांचे आधुनिकीकरण केले आहे. यामध्ये ऑनलाइन ग्राहक सेवा, पार्सल ट्रॅकिंग, कॅश ऑन डिलिव्हरी, पॅकेजिंग आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी पार्सल संकलन अशा विविध सुविधांचा समावेश आहे.500आधुनिक पार्सल सेवांमुळे व्यवसायाला नवी दिशा : डाक विभागाच्या पार्सल सेवेमध्ये २४ तास ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र, Track & Trace सुविधेद्वारे पार्सलच्या प्रवासाची माहिती, Cash on Delivery (COD) द्वारे वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय सुरक्षित पार्सल पॅकेजिंग, व्यावसायिक ग्राहकांच्या ठिकाणाहून पार्सल संकलन (Pick-up Facility), मोठ्या प्रमाणातील मेल व पार्सल प्रक्रियेसाठी Business Post Centre आणि करारबद्ध व्यावसायिक ग्राहकांसाठी वाजवी दर अशा सुविधा देण्यात येतात. तसेच ‘डाकघर निर्यात केंद्रा’च्या माध्यमातून निर्यातीसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांसाठी विशेष संधी : महिला बचत गटांनी तयार केलेले गृहउद्योगातील खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने तसेच ग्रामीण भागातील लघुउद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना देशव्यापी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने ग्रामीण उद्योजकांच्या व्यवसायवृद्धीला आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते. ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यावसायिकांनाही डाक विभागाच्या व्यापक वितरण व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे. शहरांपासून दुर्गम ग्रामीण भागापर्यंत ग्राहकांच्या घरापर्यंत उत्पादने पोहोचविण्याची क्षमता हे या सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.500लघुउद्योजक, महिला बचत गट आणि ई-कॉमर्स व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनांना देशव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या आधुनिक पार्सल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा डाक विभागाचे अधीक्षक गजेंद्र नारायणराव जाधव यांनी केले आहे.

इच्छुक उद्योजकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा किंवा बुलढाणा डाक विभागाच्या मार्केटिंग टीमशी संपर्क साधून व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या पार्सल सेवा, सुविधा व दरांची माहिती घ्यावी.500मार्केटिंग टीमचे संपर्क क्रमांक : महेश चवंड – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बुलढाणा प्रधान डाकघर (८६०५१९४६४०), शेख शब्बीर शेख बुडण – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, खामगाव प्रधान डाकघर (९७६७२१७८७९), आर. व्ही. पोफळे – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, चिखली उपडाकघर (९४२१६६१६८२), अतुल चिकाटे – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, अधीक्षक डाकघर, बुलढाणा (८७८८९००५८१).500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button