बार्शीमहाराष्ट्र

बार्शीत २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २० वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे थाटात संपन्न होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक फुलचंद नागटिळक यांची तर स्वागताध्यक्षपदी बार्शीतील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. वाय. यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.500
या संमेलनाच्या नियोजनासाठी बार्शी येथे डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतच वरील निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी साहित्य परिषदेचे विश्वस्त अनिल अनभुले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे, ज्येष्ठ साहित्यिक जयकुमार शितेळे ,विलास जगदाळे ,मदन जगताप,यांच्यासह परिषदेचे अनेक पदाधिकारी व स्थानिक साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
500
असे असेल संमेलनाचे स्वरूप – सकाळी पारंपरिक ग्रंथपूजनाने संमेलनास प्रारंभ होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन समारंभ होईल. दिवसभरात महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित वैचारिक परिसंवाद, खुले अधिवेशन आणि सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या सहभागाने बहारदार कविसंमेलनाने संमेलनाची सांगता होणार आहे.
500
महात्मा जोतिबा फुले यांचे समता, बंधुता, शिक्षण आणि सत्यशोधक विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि मराठी साहित्यातून प्रबोधनाची चळवळ अधिक गतिमान करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. या संमेलनास राज्यभरातून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि हजारो साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button