बार्शीमहाराष्ट्रशिबीर

मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वेळीच ओळखा! माधवबाग बार्शी क्लिनिकतर्फे १५ नोव्हेंबरला विशेष रक्त तपासणी शिबिर…

रक्त तपासणीची सुविधा; अॅडव्हान्स पॅकेजमध्ये व्हिटॅमिन D3, B12 तपासणीचाही समावेश; तपासणीनंतर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बदलती जीवनशैली, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि वाढता मानसिक ताण यामुळे मधुमेह, हृदयविकार तसेच विविध जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढत आहे. अशा आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने माधवबाग – बार्शी क्लिनिकच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ८ ते ११ या वेळेत माधवबाग क्लिनिक, छत्रपती कॉलनी, बाळेश्वर नाका, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.500या शिबिरामध्ये नागरिकांसाठी दोन प्रकारची रक्त तपासणी पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये १. बेसिक रक्त तपासणी – या पॅकेजमध्ये पुढील आठ महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे. CBC, HbA1c, हिमोग्लोबिन (Hb), लिपिड प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, किडनी फंक्शन, Serum Electrolytes, थायरॉईड प्रोफाइल
या तपासण्यांमुळे रक्तातील साखरेची स्थिती, हिमोग्लोबिन, कोलेस्टेरॉल तसेच यकृत, मूत्रपिंड आणि थायरॉईडच्या कार्यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
२. अॅडव्हान्स रक्त तपासणी – बेसिक पॅकेजमधील सर्व तपासण्यांसोबतच पुढील अतिरिक्त तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे. Vitamin D3, Vitamin B12
व्हिटॅमिनच्या कमतरतेसंबंधी तपासणी करण्यात येणार आहे.
500या तपासण्यांमुळे शरीरातील महत्त्वाच्या जीवनसत्त्वांच्या पातळीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रक्त तपासणी न करता तपासणी अहवालानंतर तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये रक्त तपासणीचे रिपोर्ट समजावून सांगणे, योग्य आहार, डायेट आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.500या शिबिरासाठी नागरिकांनी फोनद्वारे पूर्वनियोजित अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी ७२७६५१९१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबाग क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच रक्त तपासणीपूर्वी किमान १२ तास उपाशी राहणे आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे. मधुमेहासाठी औषधे किंवा इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी उपवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच वेळीच आरोग्य तपासणी केल्यास संभाव्य आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळवून योग्य वैद्यकीय सल्ला घेणे शक्य होते. त्यामुळे बार्शी व परिसरातील नागरिकांनी या विशेष रक्त तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button