कृषीमहाराष्ट्रलातूर

लातूरच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी परिस्थितीवर मात करून घेतले पेरूचे भरघोस उत्पादन; राज्यपालांकडून कौतुकाची थाप

B1न्यूज मराठी नेटवर्क500

लातूर : लातूरचे प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत सोपान परिहार यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथून फोन करुन दुष्काळी परिस्थितीवर मात करून पेरूचे भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

लातूरच्या औसा तालुक्यातील बाणेगाव येथील चंद्रकांत परिहार यांनी अडीच एकर शेतीमध्ये तायवान पिंक प्रजातीच्या पेरूचे उत्पादन घेऊन त्यातून १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतल्याबद्दल राज्यपालांनी परिहार यांचे भरभरून कौतुक केले.500यंदा लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला. तरी देखील ठिबक सिंचनाचा वापर करुन तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती करून चवदार पेरूचे उत्पादन घेतले ही उल्लेखनीय बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. लातूर दौऱ्यात आपण आपल्या शिवाराला प्रत्यक्ष भेट देऊ असे राज्यपालांनी परिहार यांना सांगितले.

यावेळी परिहार यांनी पाठवलेली पेरूची पेटी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांनी राज्यपालांना सुपूर्द केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस राममूर्ती, खासगी सचिव पवन सिंह आदी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button