सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी अतुल जगताप , त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, शाखा बार्शीची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत तालुका अध्यक्षपदी अतुल जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेच्या नूतन कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी गणेश पाटील व संतोष जगदाळे, तालुका कार्याध्यक्षपदी सुरज काशीद, सचिवपदी धनंजय पोळ, खजिनदारपदी पी. एस. नागटिळक, तर प्रसिद्धी प्रमुखपदी के. एल. काळेल यांची निवड झाली.
तालुका उपाध्यक्षपदी कृष्णात शेळके, बी. पी. कोलगे, एस. एच. साठे व आर. ए. पुजारी यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून आर. पी. दराडे, पी. ए. गेंड व जे. जे. कापसे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल गावडे व वराळे यांनी काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल बार्शी तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेणे यासाठी नूतन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल जगताप यांनी व्यक्त केला.




