जागतिक एड्स दिना निमित्त जनजागरण रॅलीला उत्स्फू्र्त प्रतिसाद , 3500 युवक – युवतींचा सहभाग

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जागतिक एड्स दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास साडे तीन हजार युवक – युवतींनी या रॅलीत सहभाग नोंदवला. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, विधी व न्याय प्राधीकरण न्यायाधीश नरेंद्र जोशी, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून, हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. डॉ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथून प्रारंभ होऊन सिव्हील चौक – सिध्दार्थ सोसायटी – मौलाली चौक, जगदंब चौक – सात रस्ता – शर्मा स्वीट – भगतसिंह मार्केट गार्डन – या मार्गे अश्विनी हॉस्पिटल येथे रॅलीची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. या वर्षीची थीम “Equalize” म्हणजेच आपली एकता – आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्या करिता अशी आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात एड्स बाबत जनजागृती व एचआयव्हीसह जगणाऱ्याविषयी आस्थेचे प्रतीक असणारी शपथ विधी व न्याय प्राधीकरण, न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्याकडून उपस्थितांना देण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एड्स जनजागृतीचे महत्त्व विषद करत कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी क्रांती महिला संघ, सोलापूर या संस्थेकडून एचआयव्ही एड्स जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

अश्विनी रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी, डॉ. राजेंद्र घुली, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे डॉ. श्रीकांत येळेगावकर, मानद सचिव डॉ. आयेशा रंगरेज आदि उपस्थित होते. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अश्विनी ग्रामीण वैद्यकीय मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. रॅलीचे नियोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, जिल्हा पर्यवेक्षक कृष्णा सकट आणि जिल्हा मुल्यमापन सहाय्यक डापकू दिनेश राठोड यांनी केले. सर्व मान्यवरांचे व रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अग्रजा चिटणीस यांनी केले. सुत्रसंचालन आकाशवाणी सोलापूरचे निवेदक अभिमान सराफ व अश्विनी सहकारी रुग्णालय नियमित सोलापूरचे संचालक अशोक लांबतुरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीकांत येळेगावकर यांनी केले. जनजागरण रॅली करिता सोलापुरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एन. एस. एस. विभागातील विभाग प्रमुख व विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते. रॅलीमधील उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या