अहिल्यानगरकृषीप्रशासनमहाराष्ट्र

प्रशासन थेट बांधावर ; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नोंदविली शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’!

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रशासन आता थेट बांधावर पोहोचले आहे. कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे, पोहेगाव आणि देर्डे येथे शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी धावती भेट देऊन ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेचा आढावा घेतला.

मौजे चांदेकसारे येथे कोळेकर यांनी पीक पाहणीची चौकशी करत थेट शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित पीक पाहणी नोंदणी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

तसेच, मौजे देर्डे येथे एक आदर्श उदाहरण समोर आले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर चक्क स्वतःच्या मोबाईलवरून शेतकऱ्यासमक्ष उपस्थित राहून त्यांच्या पिकाची ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी करून दिली. अधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे आणि सहकार्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या पाहणी दौऱ्यात तहसीलदार महेश सावंत हे देखील उपस्थित होते. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ई-पीक पाहणी मोहिमेला वेग आला आहे.

🌾 ठळक बाबी:

✅ अधिकाऱ्यांचा थेट शेताच्या बांधावर जाऊन संवाद.
✅ स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक.
✅ शेतकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button