जिल्हाधिकारी कार्यालय व सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील तसेच जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी स्वतः रक्तदान करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन सर्वश्रेष्ठ दान असलेले रक्तदान करावे, असे आवाहन केले. सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.




