वारकरी साहित्य परिषदेच्या बार्शी तालुका उपाध्यक्षपदी ह.भ.प. राधाताई विठ्ठल डोंगरे यांची निवड

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्रावण मासानिमित्त बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात आयोजित हरिपाठ उत्सवाच्या पवित्र वातावरणात वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व मोहोळ तालुक्यांच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये बार्शी तालुका महिला मंडळाच्या उपाध्यक्षपदी उपळे दुमाला येथील माऊली भजनी मंडळाच्या अध्यक्षा ह.भ.प. राधाताई विठ्ठल डोंगरे यांची निवड करण्यात आली.

याच कार्यक्रमात मोहोळ तालुक्याच्या अध्यक्षपदी ह.भ.प. संजीवनी संतोष पासले यांचीही निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. परशुरामजी डोंबे महाराज तसेच बार्शी तालुका अध्यक्ष ह.भ.प. रामलिंग पवार महाराज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.500या प्रसंगी बार्शी तालुका कार्याध्यक्ष गजानन कुलकर्णी, वैराग विभागाध्यक्ष ज्योतीराम मते, उपळे दुमाला येथील ह.भ.प. अंगद बाबू मते महाराज, ह.भ.प. सुनील सूर्यभान बुरगुटे महाराज यांच्यासह बार्शी तालुक्यातील महिला भजनी मंडळे व सांप्रदायिक मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प. राधाताई विठ्ठल डोंगरे यांच्या निवडीबद्दल उपळे दुमाला येथील श्रीराम भजनी मंडळ, श्री रामेश्वर भजनी मंडळ, श्री महादेव भजनी मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील धार्मिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष प्रतिनिधी – सतिशकुमार बुरुगुटे

500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या