बार्शी उपसा सिंचन टप्पा-३ व शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांची मुख्य अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नुकत्याच झालेल्या बार्शी दौऱ्यानंतर बार्शी तालुक्यातील प्रलंबित सिंचन व पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर येथे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीत बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा-३ च्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बार्शी शहराला लक्ष्याची वाडी पंप हाऊस येथून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक विचारविनिमय झाला.500यावेळी बार्शी उपसा सिंचन योजनेमधून बचत होणाऱ्या पाण्याचा लाभ सिंचनापासून वंचित असलेल्या बार्शी तालुक्यातील २१ गावांना मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील जवळगाव, हिंगणी, पिंपळगाव ढाळे, कोरेगाव, पाथरी आणि बाभूळगाव येथील लघु सिंचन प्रकल्पांचे बंदिस्त पाईपलाइनमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शहरासह ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी बैठकीत केली. या बैठकीमुळे बार्शी उपसा सिंचन योजनेच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्याची तसेच तालुक्यातील अनेक गावांच्या सिंचन व पाणीपुरवठा प्रश्नांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या