श्री गणेशोत्सव २०२६ निमित्त बार्शीत विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा व्हावा, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच बार्शी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी गणेशोत्सव काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. उत्सव ध्वनीप्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी “No DJ, No Dolby” या संकल्पनेला प्राधान्य द्यावे, तसेच सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मंडळांनी जबाबदारीने सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.500सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवा किंवा संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये किंवा ते पुढे पाठवू नयेत. अशा संदेशांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गणेश मंडळांशी समन्वय साधणे, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे तसेच सोशल मीडियावरील अफवांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव असून सर्व गणेश मंडळे, नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयातून शांततेत, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी “No DJ, No Dolby” ची शपथ घेतली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या