सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने गोकुळाष्टमी उत्साहात गुणवंतांचाही केला सन्मान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दि शिवशक्ती मैदान बार्शी येथील लालासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला तीन विविध गुणदर्शन, तसेच निरनिराळ्या स्पर्धा झालेल्या कार्यक्रमाची सांगता हभप ज्ञानेश्वर पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ् डॉ लक्ष्मीकांत काबरा,पिपंळगाव दत्त मठाचे दत्त महाराज जाधव,शिवाजी शिक्षण संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे,अशोक हेड्डा,संयोजक सेवानिवृत्त सपोनि लालासाहेब गव्हाणे, पीएसआय सुधीर गुळमे, गिरीष थोरात, उद्योजक अरुण डोईफोडे, सरदार गव्हाणे, हभप अशोक पाटील, अक्कलकोट बाळाप्पा मठाचे व्यासपीठ चालक नागनाथ आप्पा स्वामी,प्रा. जी. टी. जाधव, अमोल डिसले, माजी नगरसेवक कुमार डमरे, भाऊसाहेब कोळेकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य सुरेश जाधव,नगरसेवक गौरव शिंदे, राहुल गव्हाणे आदीसह भावीक उपस्थित होते.

यावेळी एम. डी कार्डीओलॉजीस्ट डॉ अभिजित लक्ष्मीकांत काबरा, अय्यगार बेकरीचे मालक सुरेश इरेगौडा, पत्रकार संजय बारबोले,जयकुमार शितोळे,मातृभूमी प्रतिष्ठान आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे देऊन ) करण्यात आला.500संयोजक लालासाहेब गव्हाणे यांनी पोलीस खात्यात नोकरी करून ही अध्यात्मिक वारसा जोपासला आहे हे खरोखरचं कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन हभप दत्त महाराज जाधव यांनी केले यावेळी सूत्रसंचालन सुधीर गुळमे, भाऊसाहेब कोळेकर यांनी केले तर आभार राहुल गव्हाणे यांनी मानले.

पोलीस प्रशासना सारख्या अंत्यत संवेदनशील पूर्णवेळ बांधिलकी असलेल्या खात्यात जवळपास ३८ वर्ष सेवा करून सपोनि पदावरून सेवानिवृत्त झालेले लालासाहेब गव्हाणे यांनी नोकरी काळातही आपला अध्यात्मिक वसा मोठया कौशल्याने जोपासला आहे. अक्कलकोट येथे सेवेत असताना त्यांना पारमार्थिक संप्रदायातील लोकांशी जवळीकता आली आणि त्यातून पुढे वारकरी संप्रदायातील वाचन, चिंतन,भजन, इत्यादी आवडीच्या विषयासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करत गव्हाणे यांनी स्वतः तर अध्यात्मिक अनुभूती, घेतलीच पण त्याच बरोबर इतर मित्र सहकारी आणि संपर्कातील लोकांना सुद्धा या सन्मार्गाला आणण्यासाठी प्रयत्न केले.

आज बार्शी तालुक्यात पोलीस अधिकारी लालासाहेब गव्हाणे, पीएसआय सुधीर गुळमे,प्रा. अशोक पाटील महागावकर, सरदार गव्हाणे सर, सारखे असंख्य उच्च शिक्षित लोकांचा पारमार्थिक क्षेत्रातील वाढता सहभाग हा खरोखरचं आजच्या युगात अनुकरणीय असा आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या