लायन्स क्लब बार्शी रॉयलकडून आदर्श शिक्षक व अभियंत्यांचा गौरव
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने आदर्श शिक्षक, शिक्षक सदस्य, अभियंते आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात चाटे शिक्षण समूहाचे संचालक पांडुरंग घाडगे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब रिजन-१च्या झोन-१च्या झोन चेअरमन लायन ॲड. आमिता कारंडे उपस्थित होत्या. त्यांनी क्लबच्या विविध सेवा उपक्रमांचे तसेच अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी क्लबमधील शिक्षक सदस्य लायन दयानंद रेवडकर, लायन ज्योती रेवडकर आणि लायन सुनिता खाडे यांचाही शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
याशिवाय अभियंता दिनानिमित्त क्लबमधील १३ अभियंत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये लायन जितेंद्र दोशी (माजी प्रांतपाल), लायन राहुल दोशी, लायन गणेश भंडारे, लायन सुमित जैन, लायन राजेश खाडे, लायन अमर काळे, लायन महावीर शहा, लायन रीना शहा, लायन अमोल गुंडेवार, लायन उमेश जाधव आणि लायन मनीष रुगले यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हे सर्व अभियंते क्लबच्या सेवा कार्यात सातत्याने सक्रिय योगदान देत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
४१ देशांतील नाण्यांचा दुर्मिळ संग्रह तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन कार्यशाळांचे आयोजन केल्याबद्दल उदयकुमार पोतदार यांचाही लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लायन किरण लाड आणि लायन अमृता गुंडेवार यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय लायन ज्योती रुगले आणि लायन मनीष रुगले यांनी करून दिला. या सन्मान सोहळ्यास लायन्स क्लब बार्शी रॉयलचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





