एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम; बार्शी शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात साजरे, पोलीस बांधवांना राखी तर महिलांना वृक्षभेट

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : शहर पोलीस ठाण्यात एकता महिला मंचच्या वतीने रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहपूर्ण, स्नेहपूर्ण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिला सदस्यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधुप्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे, या उपक्रमानंतर पोलीस प्रशासनाने प्रत्येक महिलेला वृक्षभेट देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे, सुनील धनवे, बाळासाहेब जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड महिला-पुरुष आणि एकता महिला मंचच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकता महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर यांनी सांगितले की, गेल्या चार-पाच वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांसाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. सणाच्या काळात घरापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बहिणीची उणीव भासू नये, या भावनेतून हा उपक्रम आयोजित केला जातो.

जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांनी मंचाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली जोशी, प्रास्ताविक कविता दसवंत, तर आभार प्रदर्शन लक्ष्मी सुतार यांनी केले.500

पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांचे कौतुक

पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी एकता महिला मंचच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सांगितले की, “कर्तव्यामुळे अनेकदा सणासुदीला घरी जाता येत नाही. अशा वेळी महिला मंचच्या सदस्यांनी राखी बांधून दाखवलेले प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचे आहे.” त्यांनी महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंध याविषयीही मार्गदर्शन केले.

वृक्षभेट ठरली आकर्षण

रक्षाबंधनाच्या औचित्याने बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रत्येक महिला सदस्याला वृक्षारोपणासाठी एक रोप भेट देण्यात आले. “झाड लावा, जपा आणि वाढवा,” असा संदेश देत पोलीस प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाची अनोखी भेट दिली. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले.

कार्यक्रमास जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, तालुकाप्रमुख कविता दसवंत, प्रसिद्धी प्रमुख गीतांजली जोशी यांच्यासह आशा विभूते, वसुधा कुंभार, स्नेहल तळेकर, उषा ठाकूर, सरिता कुलकर्णी, स्वाती सुतार, संगीता कदम, वर्षा साळुंखे, पूजा काळे, राजश्री बादगुडे, मथुरा दसवंत, मैना सोनवणे, सविता दसवंत, सुकनंदा सुरवसे, सुरेखा कोळी, पंचशीला बनसोडे, वैशाली साळुंखे आदी महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या