बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई; धस पिंपळगावात अवैध दारू विक्रीवर छापा, ₹80,290 चा मुद्देमाल जप्त

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत धस पिंपळगाव येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन इसमांवर छापा टाकला. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह एकूण ₹80,290 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील दारू, मटका, जुगार आणि इतर अवैध धंद्यांविरोधात सातत्याने प्रभावी कारवाया सुरू ठेवल्या आहेत. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.500पोलिसांना धस पिंपळगाव येथे काही व्यक्ती अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तात्काळ छापा टाकला. छाप्यामध्ये दोन ठिकाणांहून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. आरोपी संतोष अर्जुन धस, रा. धस पिंपळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर. दिनेश कैलास धस, रा. धस पिंपळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर.

दोन्ही आरोपींविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, तसेच सोमनाथ खांडेकर, स्वाती डोईफोडे, प्रदीप जगताप, गोविंद बचुटे, रमेश माने आणि शशिकांत लोकरे यांनी सहभाग घेतला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या