जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्नतक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही केली जाईल – अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त (सोलापूर शहर) दिलीप पवार, उपविभागीय अधिकारी सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वसमळे, समितीचे सदस्य जितेंद्र बनसोडे, अरुण क्षीरसागर, मोहन गायकवाड, विजय बनसोडे, विनोद रणदिवे, सुदर्शन यादव, मल्लीनाथ राचेटी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधीक्षक तथा सप्रअ सुधाकर भांगरे उपस्थित होते.500बैठकीत अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी समिती सदस्यांनी मांडलेल्या तक्रारी व सूचनांवर सकारात्मक पद्धतीने विचार करून महत्त्वाचे निर्णय समितीसमोर मांडले जातील, असे सांगितले. सदस्यांनी समितीकडे सादर केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याशिवाय, दि. 13 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येईल. या कार्यशाळेत सदस्यांनी प्रलंबित प्रश्न मांडावेत. संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील. तसेच समितीकडून प्राप्त होणारे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतील, असे अपर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी सांगितले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या