कर्मवीर वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय, बार्शी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त “लेखन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. वाचन, लेखन आणि समाजप्रबोधनाची प्रेरणा या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून मिळत असल्याचे मधुकांत ठोकळ यांनी सांगितले.500कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करून लेखन संस्कृती जोपासण्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि लोकजागृतीच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास ग्रंथालयाचे पदाधिकारी, सभासद, विद्यार्थी, वाचक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. यावेळी मधुकांत ठोकळ,सामाजिक कार्यकर्ते सुहास सुतार,सेवानिवृत्त अधिकारी भागवत बोबडे,बाळू वाघुले,नितीन गव्हाणे,राहुल लोंढे यांचेसह सभासद,वाचक आदी उपस्थित होते,ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या