माधवबागतर्फे ‘हृदयरोग मुक्त शहर’ अभियान; २ ऑगस्ट रोजी विशेष रक्त तपासणी शिबिराचे आयोजन
B1न्यूज मराठा नेटवर्क
बार्शी, दि. ३१ : हृदयविकार, ब्लॉकेज, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर माधवबाग डिव्हिजन आणि मिशन यांच्या वतीने ‘हृदयरोग मुक्त शहर’ या विशेष आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत बार्शी येथील माधवबाग क्लिनिकमध्ये होणार आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांना हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी विविध तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तपासणीत ईसीजी, हृदय गती, रक्तदाब, उंची-वजन, SpO₂, बीएमआय तसेच मोफत डॉक्टरांचा सल्ला यांचा समावेश असेल.
याशिवाय CBC, हिमोग्लोबिन, HbA1c, लिपिड प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, किडनी फंक्शन आणि थायरॉईड प्रोफाइल या तपासण्यांसह बेसिक रक्त तपासणी पॅकेज ₹७९९ मध्ये उपलब्ध राहणार आहे. महिलांसाठी विशेष पॅकेजमध्ये व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 आणि इतर महत्त्वाच्या रक्त तपासण्या समाविष्ट असून त्याची किंमत ₹१४९९ ठेवण्यात आली आहे.
माधवबागच्या क्लिनिकल हेड डॉ. क्रांती कोळी यांनी नागरिकांनी वेळेत तपासणी करून पुढील आयुष्यातील हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, माधवबागमध्ये येऊन रक्त तपासणी करून घेतल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून “हृदयरोग मुक्त” जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरासाठी फोन करून अपॉइंटमेंट घेणे आवश्यक असून संपर्क क्रमांक 7276519111 असा आहे. रक्त तपासणीपूर्वी किमान १२ तास उपाशी राहणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आली आहे.
हे शिबिर माधवबाग क्लिनिक, छत्रपती कॉलनी, बाळेश्वर नाका, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे होणार आहे. नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेऊन स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याची वेळेत काळजी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





