पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ‘ड्रग्स फ्री मोहीम’ अधिक सक्षम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

ड्रग्सच्या माध्यमातून भारताच्या तरुण पिढीला कमकुवत करण्याचे शत्रूंचे षडयंत्र – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, ३० जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे कौतुक करत, हे अभियान युवकांना जागरूक, सक्षम आणि नशामुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. नशामुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी जनजागृती, कुटुंब, समाज आणि विविध संस्थांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. युवकांची ऊर्जा आणि सकारात्मक विचार हे विकसित भारताचे बळ असल्याचे नमूद करत त्यांनी या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आशयाचे पत्र ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियान कार्यक्रमादरम्यान वाचून दाखविण्यात आले.500वरळी येथील एनएससीआय डोम येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त भारत’चा संकल्प केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करणे आवश्यक आहे. भारत हा युवकांचा देश असून, देशाला आतून कमकुवत करण्यासाठी ड्रग्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे ड्रग्सच्या संपूर्ण इकोसिस्टिमविरोधात सर्वांनी सामूहिक लढा उभारण्याची गरज आहे. आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा संबंधित बेकायदेशीर हालचाली आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि उपयुक्त माहिती देणाऱ्याला पुरस्कारही दिला जाईल.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या