क्रीडा विषयकमहाराष्ट्रमुंबई

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला दिला खास प्रेमळ आशिर्वाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा खास क्षण चर्चेचा विषय ठरला. विजयाच्या आनंदात अनुष्काने सर्वप्रथम विराटच्या डोक्यावर प्रेमळपणे हात फिरवला, त्यानंतर दोघे मनमोकळं हसले आणि शेवटी विराटला प्रेमाने मिठी मारली.

या गोड क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. काहीजण म्हणत होते की अंतिम सामन्यात अनुष्का उपस्थित असल्यामुळे भारत हरू शकतो. मात्र, भारताच्या विजयानंतर हे सर्व अपशकुनाचे दावे फोल ठरले.

‘विरूष्का’च्या या सुंदर क्षणांवर चाहते प्रेमसुमनांचा वर्षाव करत आहेत. विराटच्या कामगिरीबरोबरच अनुष्काच्या भावनिक पाठिंब्यानेही हा विजय खास बनला आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button