हर घर तिरंगा अभियानांतर्गत नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत नवीन मराठी शाळा, बार्शी येथे विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा नवीन मराठी शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” च्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला.

देशप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना केले.500या प्रसंगी नगरसेवक भारत पवार, संचालक भरतेश गांधी, अमोल डिसले, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, प्रशांत नागरगोजे, संदीप मिरगणे, शंकर वाघमारे, कु. आकांक्षा देशमुख, संतोष बोराडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. 500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या