कोल्हापूरनिधीप्रशासनमहाराष्ट्र

दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर, दि. 15 : दृष्टिहीन नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या स्वच्छेने निधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर यांच्यामार्फत ध्वजनिधी 2026- संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर ही संस्था गेली 36 वर्षापासून जिल्ह्यातील दृष्टिहीन नागरिकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य करुन त्यांचे पुनर्वसन केले जाते. असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या संस्थेला सामाजिक बांधिलकीतून सढळ हाताने आवश्यक ती मदत करावी. तसेच संस्थेमार्फत प्रत्येक शासकीय कार्यालयाला ध्वजनिधीचे बॉक्स उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांमधील दृष्टिहीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची माहिती जाणून घेतली.500यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजनिधी संकलन सुभारंभ करण्यात आला. तसेच अंध पुनर्वसन उपक्रमांतर्गत अथर्व कोळेकर (अंध) या विद्यार्थ्यांला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते लॅपटॉप वितरीत करण्यात आला. कार्यक्रमांच्या प्रारंभी संस्थाध्यक्ष सुनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार शिवानंद पिसे यांनी मानले. अंध दीपक कारंजकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी विभाग नियंत्रक (S.T) वृषाली भोसले, विजय रेळेकर, ॲड धनजय पठाडे, डॉ. नमिता खोत, जयश्री पिसे, केरबा हांडे, यांच्यासह अंध विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button