स्व. अजितदादा पवार जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पांगरीत मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २१ : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील पांगरी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, त्वचारोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग तसेच पोटाच्या विविध आजारांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध झाली.
यावेळी बोलताना ॲड. रणवीर राजेंद्र राऊत म्हणाले, “सेवा हीच खरी भक्ती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तेरणा हॉस्पिटलच्या या शिबिराचा लाभ हजारो नागरिकांना होणार असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यासही मदत होते.”
यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, माजी सरपंच रामभाऊ लाडे, सतीश जाधव, दादासाहेब गोडसे, माजी उपसरपंच धनंजय खवले, शहाजी धस, विलास लाडे, विजय ढेंबरे, दीपक गिते, सोमनाथ ढेंबरे, फुलचंद पालखे, विजयकुमार माळी, सागर गोडसे, बाळासाहेब मोरे, मंगेश कारंडे, मनोज पाटील, वैभव देशमुख, संदीप देशमुख, रविंद्र काकडे, कारी पंचायत समिती सदस्य किरण घुले, पांगरी पंचायत समिती सदस्य शरद बसवंत, सोन्या गोडसे तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





