मधकेंद्र योजनेतून शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची संधी; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. २१ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन २०२६ साठी मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व बेरोजगारांना मधमाशीपालनाच्या माध्यमातून रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असून, इच्छुकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ जुलै २०२६ अखेर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, सोलापूर गोरखनाथ बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

योजनेअंतर्गत वैयक्तिक मधपाळ व प्रगतिशील मधपाळ असे प्रमुख घटक आहेत. वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा, वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्वतःची शेती असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. प्रगतिशील मधपाळासाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण व २१ वर्षांपेक्षा अधिक वयाचा असावा. तसेच अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन असणे किंवा भाडेतत्त्वावर जमीन घेतलेली असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे मधमाशीपालन, मधमाशी प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.500योजनेची वैशिष्ट्ये : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्याच्या स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी लाभार्थ्यांनी ५० टक्के स्वगुंतवणुकीची रक्कम भरणे अनिवार्य राहील. तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.500अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र, होटगी रोड, किनारा हॉटेलसमोर, सोलापूर – ४१३००३ येथे संपर्क साधावा. तसेच dviosolapur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या