आईशक्ती फाउंडेशनतर्फे २ हजार अनाथ मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुकाचा वर्षाव

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : आईशक्ती फाउंडेशन च्या वतीने सोलापूर शहरातील आई-वडील दोघेही नसलेल्या तसेच आई किंवा वडील नसलेल्या तब्बल २ हजार विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आईशक्ती फाउंडेशनच्या अनाथ मुलींसाठीच्या या उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वालचंद महाविद्यालयाजवळील लोटस सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, डॉ अंबिका यावलकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होते.500निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील म्हणाले, आईशक्ती फाउंडेशनतर्फे समाजातील गरजू विद्यार्थिनी आणि महिलांसाठी करण्यात येणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे. ज्या विद्यार्थिनी आणि महिलांना आवश्यकता आहे अशांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे काम आईशक्ती फाउंडेशन करत आहे. आगामी काळात जिल्हाभरातील गरजू विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मदतीसह इतर उपक्रम राबवण्यासाठी शासनाची तसेच समाजातील विविध घटकांची सर्वतोपरी मदत करू, असेही निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील म्हणाले.

डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि डॉ. अंबिका यावलकर यांनीही आईशक्ती फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले. गरजू विद्यार्थिनींना सहाय्यभूत होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.5000यावेळी आईशक्ती फाउंडेशनच्या तेजश्री लकशेट्टी, लता गुंडला, तेजस्विनी मरीगुड्डी, सुनीता निलम, रोहिणी व्हनसुरे, मीनल पिसे, हेमा मुदगुंडी, प्रीती कुर्लेकर, लक्ष्मी कुर्लेकर, वासंती वाडी, प्रिती मलपेद्दी, मयुरीका चाटला, अलकनंदा बेत, ऐश्वर्या करंचकर, सूर्यकांत जिंदम, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येलदी, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्याल आदी उपस्थित होते. आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. उज्वला शिरूर यांनी सूत्रसंचालन तर मीनल पिसे यांनी आभार प्रदर्शन केले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या