गॅस कनेक्शन नसतानाही गॅस सबसिडी जमा; सौ. आशा उमराज सुतार यांना कनेक्शन देण्याची मागणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : गौडगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील सौ. आशा उमराज सुतार यांना प्रत्यक्षात कोणतेही एलपीजी गॅस कनेक्शन नसतानाही त्यांच्या बँक खात्यात गॅस सबसिडी (अनुदान) जमा होत असल्याने त्यांना नवीन गॅस कनेक्शन मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.5000याबाबत संबंधित कार्यालयाकडे गॅस कनेक्शन मिळावे अशी मागणी करूनही, त्यांच्या बँक खात्यात गॅस अनुदान जमा झाल्याची नोंद असल्यामुळे नवीन गॅस कनेक्शन मंजूर करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.500या गंभीर त्रुटीची तातडीने दखल घेऊन संबंधित नोंदींची पडताळणी करावी, चुकीची सबसिडी नोंद रद्द करून सौ. आशा उमराज सुतार यांना तात्काळ गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापुर ओंकार पडोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या