अत्याधुनिक सोयी युक्त मोबाईल व्हॅनचा उद्या लोकार्पण सोहळा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : इंडीयन रेडक्रॉस सोसायटी शाखा बार्शी संचलीत श्रीमान रामभाई शाह ब्लड सेंटरसाठी रक्त संकलनासाठी आय.एफ.आर.सी. (आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेच्या ) सहकार्याने अत्याधुनिक सोयीनी युक्त अशी मोबाईल व्हॅन देणगीव्दारे मिळाली असून याचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.3) सकाळी साडे दहा वाजता इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीचे मानद सचिव अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते इंडीयन रेडक्रॉस सोसायटी बार्शीचे उपाध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव व अशोक डहाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती शाह ब्लड सेंटरचे चेअरमन डॉ.विक्रम निमकर यांनी दिली. ब्लड सेंटर आपल्या दारी ही संकल्पना घेऊन व काळाची गरज ओळखून रक्त संकलनासाठी बार्शीच्या शाह ब्लड सेंटरला आंतरराष्ट्रीय इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून ही आधुनिक व्हॅन मिळाली आहे.  सुमारे 46 लाख रूपयांच्या या व्हॅनमध्ये एकावेळी तिघेजण आरामदायी पध्दतने रक्तदान करू शकतात या व्हॅनमध्ये  रक्तदात्यांचे फॉर्म भरणे, टेस्टींग करणे, यासह लॅपटॉप प्राजेक्टरची देखील सोय आहे. जेणे करून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करणे व रक्तदात्यांची योग्य ती काळजी घेणे संयोजकांना सहज सुलभ होणार आहे. ग्रामीण भागात रक्तदान शिबीर घेणे यामुळे या पुढे शाह ब्लड सेंटरला अधिक सोपे जाणार आहे. यापूर्वी शाह ब्लड सेंटरकडे स्वमालकीच्या दोन आधुनिक रक्त संकलनासाठीच्या मोबाईल व्हॅन सेवेत आहेत. आता ही तिसरी व अत्याधुनिक मोबाईल व्हॅन आल्याने रक्त संकलनासाठी व  शिबीरासाठी होणारा अनावश्यक खर्च व वेळेची बचत होणार असल्याची माहिती शाह ब्लड सेंटरचे सचिव प्रा.डॉ.दिलीप कराड यांनी दिली. या कार्यक्रमासाठी रक्तदात्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या