बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; बार्शीला पहिलीच नगरपालिका संचलित CBSE इंग्रजी माध्यम शाळा

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : शहराच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. नगरपालिका शिक्षण मंडळ, बार्शी संचलित न.पा. शाळा क्रमांक २१ येथे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत इंग्रजी माध्यम (CBSE) स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यास सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

हा निर्णय बार्शीसाठी विशेष महत्त्वाचा असून, नगरपरिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच इंग्रजी माध्यमाची CBSE शाळा ठरणार आहे.50000या शाळेस मान्यता मिळावी यासाठी विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे आणि शासनाच्या निर्णयामुळे बार्शीकरांची अनेक वर्षांची अपेक्षा अखेर पूर्ण झाली आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक लाभ गोरगरीब, कष्टकरी, स्वच्छता कामगार, शेतकरी, मजूर तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या खासगी CBSE शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आता नगरपालिका संचलित शाळेतच दर्जेदार इंग्रजी माध्यमातील CBSE शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.5000यामुळे बार्शीतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आधुनिक शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आता स्थानिक स्तरावरच खुला होणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच बार्शीच्या शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्नासाठी यापुढेही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून जनतेच्या हिताचे निर्णय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button