बार्शीमहाराष्ट्रसत्कार

बार्शीत मुस्लिम बिरादार जमात संस्थेतर्फे १०८ गुणवंतांचा भव्य सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क5099

बार्शी : मुस्लिम बिरादार जमात संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह डॉक्टर, वकील आणि स्पर्धा परीक्षांत यश मिळविलेल्या एकूण १०८ जणांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल तर उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.50प0यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, डॉ. संदीप तांबारे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.5000समीर काझी यांनी मोबाईल, रील्स व व्यसनांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचे आवाहन केले, तर आमदार राजेंद्र राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात आमदार दिलीप सोपल व आमदार राजेंद्र राऊत यांची एकत्र उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. समाजासाठी स्वतंत्र हॉल, हॉस्पिटल व शैक्षणिक संस्था उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. महिलांसह समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button