आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बार्शीत तीव्र आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस महागाई आणि शेतकरी-कामगार प्रश्नांवर तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी

B1न्यूज मराठी नेटवर्क590

बार्शी, दि. 26 : आयटक कामगार केंद्र व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात बार्शी तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे आंदोलन कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व आयटक जिल्हा सचिव कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलकांनी महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कामगारांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.500

यावेळी नायब तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी व जीवनावश्यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करावेत, शेतीमालाला हमीभाव द्यावा, खत व बियाणे अनुदानासह स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, साठेबाजांवर कारवाई करावी, शेतकरी कर्जमाफी करावी, तसेच विविध कर्मचारी वर्गाला किमान ३० हजार रुपये वेतन लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.500तसेच कामगार कायद्यांमधील बदल थांबवावेत, बेरोजगारांना रोजगार द्यावा, शिक्षणातील बाजारपेठ थांबवावी, नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आमदार-खासदारांच्या पेन्शन योजना बंद कराव्यात, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला.

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, कॉम्रेड सतीश गायकवाड, लहू आगलावे, आनंद गुरव, भारत भोसले, भारती मस्तुद, संपत खताळ, निर्मला सरवदे, बिबीशन हुरकुडे, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, नानासाहेब ठाकरे, प्रमिला शिंदे, सुवर्णा नेंदाने, शितल करडे, सविता नागटिळक, सुनील भोसले, दुर्गा गवळी, विजय ढवारे, केशव गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button