क्राईमबार्शीमहाराष्ट्र

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी, दि. ८ जुलै : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावर करणाऱ्या एका इसमावर बार्शी तालुका पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जुलै २०२६ रोजी मा. सपोनि. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जामगाव येथील बाळराजे चौक परिसरात एक तडीपार इसम फिरत आहे. माहितीची खात्री करून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले.5000पोलीस चौकशीत संबंधित इसमाचे नाव तथागत मुकेश मस्के (वय २४ वर्षे, रा. भीमनगर, बार्शी) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडे बार्शी तालुक्यात उपस्थित राहण्याबाबत विचारणा केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.5000तपासादरम्यान संबंधित इसमाविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांसाठी तडीपार आदेश जारी केलेला असून, त्याने त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १४२ अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button