क्राईममहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर पोलीस गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणारे 3 सराईत गुन्हेगार जेरबंद, 4 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

B1न्यूज मराठी नेटवर्क5प00

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाठून, डोळ्यात चटणी फेकून आणि शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या ३ सराईत आरोपींच्या टोळीला सोलापूर शहर गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून २७ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, चोरीत गेलेली क्रेटा कारची चावी, चाकू, मिरची पावडर, एक ऑटो रिक्षा आणि मोबाईल फोन असा एकूण ४,३५,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २ जुलै २०२६ रोजी फिर्यादी मल्लिकांर्जुन विश्वनाथ कोणी आणि त्यांचे मित्र शांतकुमार रेवणप्पा येडगे हे विजापूर (कर्नाटक) येथील एका लग्नाचे कार्य आटोपून आपल्या क्रेटा गाडीने कर्नाटक राज्यातील हुमनाबादकडे जात होते. रात्रीच्या वेळी विजापूर रोडवरील ‘न्यू अंबर हॉटेल’जवळ आले असता, पाठीमागून आलेल्या एका ऑटो रिक्षानी त्यांच्या क्रेटा गाडीला आडवे मारले. रिक्षामधून उतरलेल्या तीन इसमांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या डोळ्यात थेट मिरचीची चटणी टाकली. त्यांना बेदम मारहाण करत गळ्याला चाकू लावला. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील २७ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या आणि क्रेटा गाडीची चावी जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.500गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला तात्काळ आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) शंकर धायगुडे, स.पो.नि. भरत चंदनशिव आणि त्यांच्या तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला.

दिनांक ७ जुलै २०२६ रोजी पोलीस पथकाला माहिती मिळाली की, विजापूर नाका येथील कंबर तलाव, झाशीची राणी पुतळ्याजवळील मोकळ्या मैदानात संशयित आरोपी चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एकत्र जमले आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. शिवाजी उर्फ मरक्या मोहन जाधव (वय ३४ वर्ष, रा. प्रताप नगर तांडा, विजापूर रोड, सोलापूर) – हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून याच्यावर पूर्वी विजापूर नाका आणि मंद्रुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. महादेव उर्फ मंड्या मोहन जाधव (वय २५ वर्ष) अमित उर्फ इंडीया हरीशचंद्र पवार (वय ३३ वर्ष)5000सुरवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आम्हीच विजापूर रोड हायवेवर क्रेटा कार अडवून, डोळ्यात चटणी टाकून आणि चाकूचा धाक दाखवून ३ सोन्याच्या अंगठ्या व कारची चावी लुटल्याचे त्यांनी मान्य केले.

सदर धडक कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, एसीपी दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, आणि स.पो.नि. गुन्हे (अति. कार्यभार) अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. भरत चंदनशिव आणि अंमलदार अंकुश भोसले, जावेद जमादार, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, वसिम शेख, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, आबा सावळे, धिरज सातपुते, अजिंक्य माने, विठ्ठल यलमार, चालक सतिश कटे, बाळू काळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कर्डिल प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड या पथकाने कामगिरी केली आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button