बार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी दिला हिंदू – मुस्लिम एकतेचा संदेश आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वैराग येथील हजरत मलंग शहा दर्गा येथे सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत हजरत मलंगशहा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजरत मलंगशहा उरुस निमित्त वैराग येथील दर्गा येथे सर्व मुस्लिम समाज एकत्रित सामाजिक सलोखा राखण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. मात्र यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. मात्र, या सणाच्या निमित्ताने वैराग शहरामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय वैरागसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम एकता बघायला मिळाली आहे.

यावेळी मलंग शहा दर्गा येथे मौलाना अ. कादर बेग, मो. इसाक बागवान, शाहबुद्दिन अत्तार, डॉ. महामुद शेख, अहमद शेख, हसन सय्यद, जमीर शेख, अफजल शेख, बादशाह शेख, शादुल पठाण, अबुबकर शेख, अहमद शेख, इरफान शेख, जब्बार बागवान आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button