कृषीबार्शीमहाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय द्राक्ष व बेदाणा मार्केट उभारणीसाठी आमदार राजेंद्र राऊत सरसावले!​शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ऐतिहासिक पाऊल; द्राक्ष व बेदाणा उत्पादकांसहित फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​बार्शी : गेली चार दशके बार्शीच्या जनमानसावर आणि राजकारणावर आपल्या नेतृत्वाचा प्रभाव पाडणारे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यात आंतरराष्ट्रीय द्राक्ष आणि बेदाणा मार्केट उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. राजाभाऊंच्या या कणखर आणि व्यावसायिक दूरदृष्टीमुळे नितीन बापू कापसे, लालासाहेब गव्हाणे, अविनाश देशमुख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील असंख्य द्राक्ष व बेदाणा उत्पादक तसेच फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

​राऊत घराण्याला अनेक पिढ्यांचा कृषी संस्कृतीचा वारसा लाभला आहे. राजकीय पटलावर कार्यरत असतानाही आमदार राजाभाऊ राऊत यांनी नेहमीच दूध, फळे, भाजीपाला, भरडधान्य आणि इतर सर्व शेती उत्पादनांच्या सक्षम मार्केटिंग व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले, त्यावेळी राजाभाऊंनी अत्यंत धैर्याने खाजगी बाजार समितीचा पर्याय यशस्वी करून दाखवला. सहकार क्षेत्रातील धुरंधर आणि राज्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधातून बार्शीत खाजगी बाजार समितीचा उदय झाला आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्या सहकार्याने बार्शीची मूळ कृषी उत्पन्न बाजार समिती देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी राऊत यांच्या नेतृत्वाखाली आली.5000कर्मवीर मामासाहेब जगदाळेंच्या चळवळीचा वारसा
​बार्शी तालुक्याला शेती सुधारणेचा मोठा इतिहास लाभला आहे. सन १९३७ मध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी मार्केट सुधारणेसाठी आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आंदोलन उभे केले होते. आज या ऐतिहासिक घटनेला ९० वर्षे पूर्ण होत असताना, आमदार राजाभाऊ राऊत यांनी द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारण्याचा विडा उचलून कर्मवीरांचा हाच वारसा पुढे नेला आहे.

​विधान परिषदेच्या निवडणुकीत ८१ टक्के मतांची ऐतिहासिक कमाई करत विजयी वीर ठरलेल्या राजाभाऊंनी अनेक राजकीय व सामाजिक अडथळे पार केले आहेत. बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताचा आशीर्वाद आणि शेतकऱ्यांच्या संवेदना जपणारे मन यांच्या जोरावर ते बार्शी आणि वैराग भागाला आंतरराष्ट्रीय बेदाणा मार्केटच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देतील, यात शंका नाही.5000या महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी कृषी विभाग, पणन विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था आणि बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील हजारो कृषी पदवीधर आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विश्वासास पात्र ठरलेले आमदार राजाभाऊ राऊत आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

​या ऐतिहासिक प्रवासात राजाभाऊंना साथ देणाऱ्या कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे, द्राक्ष बागायतदार संघाचे लालासाहेब गव्हाणे, अविनाश देशमुख, काळे यांच्यासह सर्व ज्ञात-अज्ञात द्राक्षप्रेमी आणि शेतकऱ्यांमधून आमदार राजाभाऊ राऊत यांच्या या निर्णयाचे जाहीर स्वागत केले जात असून, त्यांचे अभिनंदन करून आभार आभार देखील मानले जात आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button