बार्शीमहाराष्ट्र

बार्शीत भटक्या कुत्र्यांचा पुन्हा धुमाकूळ; विद्यार्थ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरातील संभाजी राजे शॉपिंग सेंटर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. क्लासवरून घरी परतत असलेल्या श्रवण सुहास कांबळे या विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्यांच्या घोळक्यातील एका कुत्र्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील सतर्क नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.5000घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने विद्यार्थ्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.5000स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संभाजी राजे शॉपिंग सेंटर परिसरात तसेच शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असून, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना सतत धोका निर्माण होत आहे. नगरपालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button