लायन्स क्लब बार्शी रॉयल व विधान परिषदेवर आमदार राजेंद्र राउत यांची निवड झाल्याबद्दल आरोग्य शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शनिवार ४ जुलै २०२६ रोजी विधान परिषदेवर नूतन आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांची निवड झाल्याबद्दल व लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्या वतीने मार्केट यार्ड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्घाटन आ.राजेंद्र राऊत यांनी दीप प्रज्वलन करून केले. त्यांनी लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्या उपक्रमाचे व सेवा कार्याचे कौतुक केले. त्यांच्या आठवणीतील लायन्स क्लब रॉयल यांनी कोविड काळातील केलेल्या सेवाकार्याची आठवण करून दिली.
पुढील सेवा कार्यासाठी जिथे गरज लागेल तिथे मदत करण्याचे आश्वासन रुपी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. कल्बचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल याने क्लबचे सेवा कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची संकल्पना मांडली गरजू व गरजवंतांना मदतीसाठी कायम सेवेत राहू अशी यावेळी इच्छा व्यक्त केली. आरोग्य शिबिरा सोबतच वृक्षारोपण लागवडीची संकल्पना ठेवली. ह्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे जि.प अध्यक्ष दीपक वैद्य ,नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, पंचायत समितीच्या सभापती सौ. मीनाक्षी रोंगे, बाजार समितीचे सभापती विजय गरड, सज्जन गायकवाड उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 32 व्यक्तींनी रक्तदान केले .रक्तदान शिबिर पीडीजी लायन जितेंद्र दोशी, ला़ सुनिल पाटील,राहुल दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष लायन मंगेश बागुल, सेक्रेटरी लायन दयानंद रेवडकर, प्रोजेक्ट चेअरमन ला. तन्मय बुडूक हे उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब बार्शी रॉयल चे सर्व सभासदांनी परिश्रम घेतले .रक्तदान शिबिर श्रीमान रामभाई शहा रक्त केंद्र बार्शी यांच्यावतीने घेण्यात आले. त्यावेळी डॉ. नानासाहेब बारसकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. गणेश भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. दयानंद रेवडकर सर यांनी केले.




