सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेत सुयश विद्यालयाचे दणदणीत यश; ३५ विद्यार्थ्यांची सुवर्णकामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सुयश विद्यालय, बार्शी येथे राबविण्यात येणाऱ्या फाउंडेशन कोर्सच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सायन्स ओलंपियाड फाउंडेशन (SOF) अंतर्गत घेण्यात आलेल्या सायन्स ओलंपियाड व मॅथेमॅटिक्स ओलंपियाड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत इंटरनॅशनल गोल्ड, इंटरनॅशनल ब्राँझ, झोनल गोल्ड व झोनल ब्राँझ पदकांची भरघोस कमाई केली.
सुयश विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विविध स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी व्हावी या उद्देशाने फाउंडेशन कोर्स प्रभावीपणे राबविण्यात येतो. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायन्स, गणित व इंग्रजी विषयांच्या आंतरराष्ट्रीय ओलंपियाड परीक्षांसाठी सक्षमपणे तयार केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला.
सायन्स ओलंपियाड – झोनल ब्राँझ पदक विजेते विद्यार्थी
- मानस मारुती जाधव – झोनल ब्राँझ पदक
- सानवी संदीप गायकवाड – झोनल ब्राँझ पदक
- स्नेहजीत संजय पाटील – झोनल ब्राँझ पदक
- स्वराली श्रीनिवास धोंगडे – झोनल ब्राँझ पदक
- आरोही नरसिंह अंबुरे – झोनल ब्राँझ पदक
- विरेन आशय सातारकर – झोनल ब्राँझ पदक
- अद्विक जयकुमार घनचेकर – झोनल ब्राँझ पदक
- मनस्वी रविकांत शिंदे – झोनल ब्राँझ पदक
- युवा मयूर बलदोटा – झोनल ब्राँझ पदक
- अद्विका धीरज पवार – झोनल ब्राँझ पदक
- रेहान शाहिद सौदागर – झोनल ब्राँझ पदक
- अविनाश गणेश शिंदे – झोनल ब्राँझ पदक
- अवंती सुदर्शन पवार – झोनल ब्राँझ पदक
- अन्वी प्रसाद तळेकर – झोनल ब्राँझ पदक मॅथेमॅटिक्स ओलंपियाड – इंटरनॅशनल गोल्ड / झोनल गोल्ड / इंटरनॅशनल ब्राँझ पदक विजेते विद्यार्थी
- ओवी समाधान रोटे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- नक्षत्रा धनेश जगदाळे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- रेहान शाहिद सौदागर – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- श्लोक नरेंद्र कंगेटी – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- शौर्य उमेश देशमाने – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- मनस्वी रविकांत शिंदे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- अनिरुद्ध गणेश राऊत – झोनल गोल्ड पदक
- विरेन आशय सातारकर – इंटरनॅशनल ब्राँझ पदक
- आरोही नरसिंह अंबुरे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- स्वराली श्रीनिवास धोंगडे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- त्रिशा तुषार पाडुळे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- सानवी संदीप गायकवाड – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- मानस मारुती जाधव – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- कार्तिक श्रीपाद कोळेकर – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- कुणाल बिरमल रोंगे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- वेणू सचिन बुरांडे – इंटरनॅशनल गोल्ड पदक
- अभिनव अजित निकम – इंटरनॅशनल गोल्ड पदक
या यशस्वी विद्यार्थ्यांना सायन्स विषयासाठी श्रीमती मोनल डमरे मॅडम व श्रीमती अमृता गवारे मॅडम, तर गणित विषयासाठी श्रीमती लता आंबुरे मॅडम व श्रीमती अनुराधा जाधव मॅडम यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी विठ्ठल सत्यवान पाटोळे हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक नलवडे साहेब, संस्थेच्या मार्गदर्शिका मा. सौ. प्रतिभा नलवडे मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम तसेच उपमुख्याध्यापक येवले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते पदके स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसून येत होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
सुयश विद्यालयाने स्पर्धा परीक्षांमधील आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




