बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

सुयश विद्यालय, बार्शीचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश; राज्य गुणवत्ता यादीत ८ विद्यार्थी, तर तब्बल ११८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये सुयश विद्यालय, बार्शीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यभरात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या दोन्ही गटांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता पाचवीच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती शशिकांत साठे हिने ९०.६६ टक्के गुणांसह राज्यात १५ वा क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पाचवीतील ५८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.

इयत्ता आठवीच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाच्या तब्बल ७ विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान मिळविले.5000

राज्य गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी :

प्रथम उर्वीच सचिन दराडे – ९६% गुण, राज्यात तिसरा क्रमांक
शौर्य शामसुंदर गवळी – ९६% गुण, राज्यात तिसरा क्रमांक
सर्वज्ञ प्रदीप खराडे – ९४% गुण, राज्यात आठवा क्रमांक
आर्या गणेश कुरुंद – ९२% गुण, राज्यात बारावा क्रमांक
तेजस बाळू जाधवर – ९२% गुण, राज्यात बारावा क्रमांक
अक्षरात दिनेश ठोंगे – ९१.३३% गुण, राज्यात चौदावा क्रमांक
श्रेया विष्णू तांबडे – ९१.३३% गुण, राज्यात चौदावा क्रमांक इयत्ता आठवीतील ६० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.

अशा प्रकारे इयत्ता पाचवी व आठवी मिळून विद्यालयाचे एकूण ११८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरनी असून राज्य गुणवत्ता यादीत ८ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविल्याने “सुयश विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा डंका” संपूर्ण राज्यात घुमला आहे.

या अभूतपूर्व यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती वर्गासाठी मराठी विषय श्रीमती रेश्मा बोधले मॅडम, इंग्रजी श्रीमती अर्चना घोलप मॅडम, बुद्धिमत्ता श्रीमती सोनाली बोंगाळे मॅडम आणि गणित श्रीमती वैशाली गाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती वर्गासाठी गणित श्रीमती विजयालक्ष्मी सुरवसे मॅडम, मराठी श्रीमती अर्चना माने मॅडम, बुद्धिमत्ता श्रीमती सोनाली बोंगाळे मॅडम आणि इंग्रजी श्रीमती सुनिता शेटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.50000या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम, उपमुख्याध्यापक संदीप येवले सर तसेच संस्थापक श्री शिवदास नलवडे साहेब यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास अध्यक्ष म्हणून मा. पत्रकार संतोष (नाना) सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक शिवदास नलावडे साहेब, प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रतिभा नलवडे मॅडम, संस्थेच्या मार्गदर्शिका तथा एसबीआय शाखा व्यवस्थापक श्रीमती माधुरी घोलप मॅडम उपस्थित होत्या. तसेच पत्रकार गणेश शिंदे, मा. पत्रकार विनोद ननवरे आणि पत्रकार शंकर लाखे यांनीही उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी संस्थापक शिवदास नलवडे साहेब यांनी तातडीने शाळास्तरावर छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य व जंगी सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button