नवीन मराठी प्राथमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमक

B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग (ता. बार्शी) : नवीन मराठी प्राथमिक विद्यालय, पंचशील नगर, वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
कु. कल्याणी बापू मिसाळ
देवराज सुशांत पाटील
ओम योगेश कोरे
श्रेयश सचिन धर्मे
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल (दादा) कोरके, डॉ. अमिता (दीदी) कोरके, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा (काकी) कोरके, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहन गडसिंग सर, बाळासाहेब गवळी सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे श्रीमती सुनिता शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयासह वैराग परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व ग्रामस्थांकडूनही यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




