पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावे – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क0000

अकोला, दि. २ : प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. त्यादृष्टीने पॉश कायद्यांतर्गत आस्थापनांमध्ये स्थापित तक्रार निवारण समित्यांनी अधिक जागरूक राहून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे केले.5000कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (पॉश ऍक्ट) कायद्याबाबत कार्यशाळा श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव दिगंबर दाभाडे, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, नंदिता प्रधान, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, पर्यवेक्षकीय अधिकारी गिरीश पुसदकर आदी उपस्थित होते.

श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, महिलांसाठी प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. महिलांना सुरक्षित आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित ऑडिट होण्याची गरज आहे.50000सरकारी, खासगी, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील प्रत्येक स्थळी ‘ कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायद्याच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी. महिलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि लिंग-संवेदनशील कार्य वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत राहून कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी. तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रास्ताविक केले. विविध आस्थापनांमधील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कार्यशाळेत सहभागी झाले होते.5000प0

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या