बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली; गणेश कुंभार बार्शी शहर चे नवे पोलीस निरीक्षक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्तीचे आदेश जारी केले असून बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी गणेश कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच विनंती बदली केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्जांचा विचार करून या बदल्या करण्यात आल्या आहेत.5000आदेशानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांची बार्शी शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.500सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हे आदेश जारी केले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ नव्या ठिकाणी हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात बदल झाला असून नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या कार्यपद्धतीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.590

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या