पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

बार्शीतील सचिन वायकुळे लिखित ‘ तिमिर छेदताना ‘ चरित्र्य ग्रंथाला पुण्यातील राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार

राजर्षी शाहू मल्टीपर्पज फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन व शांतिदूत परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा हा प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार लेखक सचिन वायकुळे यांना प्रदान करण्यात आला.शेजारी पद्मश्री उदय देशपांडे, डॉ. सुरेश राठोड, निवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव आदी.

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी, दि. २८ : राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीनिमित्त येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ‘ तिमिर छेदताना ‘ या चारित्र ग्रंथाला पुण्यातील राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार देऊन पुण्यात सन्मानित करण्यात आले.
राजर्षी शाहू मल्टीपर्पज फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन व शांतिदूत परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा हा प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार पुण्यातील पत्रकार भवन येथे पार पडला.
50000बार्शीचे लेखक वायकुळे यांनी “तिमिर छेदताना” या ग्रंथातून एका अनाथ व्यक्तीच्या यशस्वी जीवन चरित्राचा वेध घेत सामाजिक जाणीव, संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे मांडला आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजविणारे आणि प्रेरणा देणारे लेखन केल्याबद्दल वायकुळे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान आला.5000यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहत राज्यसभेच्या खासदार डॉ.ज्योती वाघमारे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पद्मश्री उदय देशपांडे, सर्किट बेंच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश राठोड, शांतिदूत परिवाराचे प्रमुख तथा निवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button