लायन्स युती मैत्री फेस्टिवल चा बक्षीस वितरण व समारोप सोहळा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : या फेस्टिवल मध्ये बार्शीतील महिला आणि युवती करिता विविध स्पर्धा,मनसोक्त खरेदीसाठी नावीन्यपूर्ण स्टाॅल्सची रेलचेल होती.१७ व १८ सप्टेंबर या दोन्ही दिवशी लकी ड्रॉ मध्ये पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण,होम थिएटर आणि अचानक फेरीद्वारे अनेक बक्षीसांची लय लूट करण्यात आली. या फेस्टीवल मध्ये बार्शीतील महिला आणि युवतींसाठी विविध स्पर्धा तसेच आगळीवेगळी मदर बेबी,बाळगाेपाळां करितांही राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस, स्त्रोत पठण स्पर्धा या सर्व १६ स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लायन MJF प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर (माजी प्रांतपाल,माजी नगराध्यक्ष) सांगोला. ला MJF शीला झपके,पु.ना. गाडगीळ संचालिका सौ.भाग्यश्री देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब बार्शी टाउन चे अध्यक्ष ला. अमित कटारिया, ला.आदित्य कोठारी , ला. राजाभाऊ काळे व सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमास झपके सरांनी,अतिशय नियोजनबद्ध व कमालीच्या उत्साह पूर्ण हा कार्यक्रम अनुभवण्याची संधी मला व शीला ला प्राप्त करून दिली व केवळ स्त्रियांनी स्त्रियांसाठी केलेल्या “युती मैत्री” या अफलातून यशस्वीपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. याबद्दल आपण व आपल्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन असे गौरवद्गगार काढले. शनिवार व रविवारी घेण्यात आलेल्या स्पर्धा मधील विजेते.
१)राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस प्रथम अनन्या लोकरे,शुभ्रा बिडवे. २)स्त्रोत पठण प्रथम अनुष्का पुरोहित ३) केक डेकोरेशन प्रथम-ईश्वरी वायचळ ४)मक्यापासून पदार्थ. प्रथम-सोनाली सुराणा. ५)डेझर्ट चे प्रकार- प्रथम अमृता नागशेट्टी ६)साडी डिझाईन रांगोळी प्रथम- प्रीती काशीद. ७) ज्वारीच्या पिठापासून तिखट पदार्थ प्रथम – श्वेता गांधी ८)मेकअप आर्टिस्ट स्पर्धा प्रथम- कोमल टूरके.९)सोलो डान्स (लहान गट) प्रथम-गायत्री जेऊरे (मोठा गट) प्रथम आदिती देशमुख. १०)फ्रुट आणि सलाड डेकोरेशन प्रथम मयुरी मुनोत. ११)खोबऱ्यापासून गोड पदार्थ-प्रथम प्रेमा राऊत.१२)मुखवास विविध पदार्थ-प्रथम विनम्रता वायकर. १३)चिवड्याचे प्रकार-प्रथम अंजली कुलकर्णी. १४)मेहंदी-प्रथम मयुरी उबाळे. १५)मदर बेबी स्पर्धा-प्रथम शितल बिडवे ,शुभ्रा बिडवे.१६) ग्रुप डान्स (लहान गट)-प्रथम जान्वही मोरे ॲन्ड ग्रुप (मोठा गट) प्रथम-स्टेप अप डान्स ग्रुप.

या कार्यक्रमाच्या आयोजनातून आम्ही महिला सबली करण आणि महिलांना धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देता यावा आणि त्यांनी भरभरून आनंद लुटावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी हा फेस्टिवल घेत असतो असे तेजस्विनी च्या अध्यक्षा ला. योगिता कटारिया यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना सांगितले, क्लब मधील सर्व महिला सदस्य आणि बार्शी टाउन क्लबचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले ला.प्रज्ञा हाजगुडे यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून तर ला.सुदर्शना सुराणा यांनी खजिनदार म्हणून कार्य केले.
कार्यक्रमाची सांगता तेजस्विनीच्या सेक्रेटरी ला.वैशाली जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या