बार्शीमहाराष्ट्र

भरपावसात अतिवृष्टीग्रस्त भागाची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार दिलीप सोपल यांनी केली पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दाहिटणे येथे अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांनी शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार एफ.आर शेख, कृषी अधिकारी संतोष कोयले, माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे हे उपस्थित होते.

सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या –

शेतीपिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत.

शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी.

शासन निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

शेतकरी हे राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ असून त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. त्यामुळे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने तातडीने उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button