अमरावतीनिवडमहाराष्ट्र

परतवाडा येथील “पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 628 उमेदवारांची प्राथमिक निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अमरावती : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडल करिअर सेंटर अमरावती यांनी 22 ऑगस्ट रोजी परतवाडा येथील कोर्ट रोड स्थित कल्याण मंडपम मध्ये आयोजित केलेल्या पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एकूण 628 उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून 806 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 777 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. महिंद्रा अँड महिंद्रा प्रा.ली.नागपूर, जाधव गियर्स ली.अमरावती,वैभव एन्टरप्राईजेस प्रा.लि.नागपूर,जाबील सर्किट इंडिया प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर प्रा.लि. नागपूर, बीव्हीजी पुणे, कोअर प्रोजेक्ट इंजिनियर अमरावती,धूत ट्रान्समिशन प्रा.लि., श्रीराम फायनान्स, ब्लिंकिट,कृपा कन्सल्टनसी पुणे, प्रिसिजन मॅपिंग सोल्युशन अमरावती यांच्याकडून थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गट विकास अधिकारी ,पंचायत समिती अचलपूर,नगरपरिषद अचलपूर,सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर,शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर आदी 16 कंपन्या व कार्यालयांच्या प्रतिनिधींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून विविध पदांसाठी 628 उमेदवरांची प्राथमिक निवड केली आहे.500

आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले राज्य् स्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर आमदार केवलराम काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता राऊत यांनी केले तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button