नाशिकनिवडणूकमहाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नाशिक, दि. 22 जून : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ बबन गीते विजयी झाले. त्यांना 357 मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248, तर प्रसाद बळीराम हिरे यांना शून्य मते मिळाली.

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान झाले. एकूण 619 पैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होते.5000मतमोजणीसाठी एकूण चार टेबल लावण्यात आले होते. एकूण 618 पैकी 13 मते अवैध ठरली. त्यामुळे विजयी मतांचा कोटा 303 एवढा निश्चित करण्यात आला. गीते यांनी पहिल्याच फेरीतच विजयी मतांसाठी आवश्यक (303 मते) मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.5000निवडणूक निरीक्षक शंभरकर यांच्या उपस्थितीत, निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य गीते यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. निवडणूकीच्या मतमोजणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button