नोकरीबार्शीमहाराष्ट्रमेळावा

वैरागमध्ये प्रथमच मल्टी ब्रँड कंपनींचा भव्य नोकरी भरती मेळावा

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : वैराग व परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैरागमध्ये प्रथमच होत असलेल्या या मल्टी ब्रँड कंपनींच्या भरती मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.5000हा भरती मेळावा बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाहाजीराव पाटील सांस्कृतिक भवन, वैराग (ता. बार्शी) येथे आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात Tata, Bajaj, Hero, Honda, JCB, Leyland, Mahindra, Maruti Suzuki यांसह विविध नामांकित कंपन्यांच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ७ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण उमेदवार, तसेच ITI, डिप्लोमा, पदवीधर आणि इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना या भरती मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच जॉईनिंग लेटर देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.5000या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.

या भरती मेळाव्याचे आयोजन संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी धनराज गरुड (९४२१०३०५९६), महेश खेंडार (९०२८२३२४८९) आणि आनंद काशीद (९८२२७१३७३८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.5099

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button