बार्शीमहाराष्ट्रसत्कार

दूध विकणाऱ्या वडिलांच्या कष्टांचे चीज; संदीप पाटील सहाय्यक आयुक्तपदी विराजमान

मानवता संस्थेकडून यशस्वी सुपुत्राचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

वैराग : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण राघूचीवाडी (ता. जि. धाराशिव) येथील सुपुत्र संदीप शोभा रमेश पाटील यांनी घालून दिले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत त्यांची सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली आहे.50000या उल्लेखनीय यशाबद्दल मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक यांच्या हस्ते संदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब लोंढे, म्हंकाळे सदगर, आप्पासाहेब नागटिळक, बापू नागटिळक, स्वप्नील भालशंकर, भैरवनाथ चौधरी, समर्थ पुराणिक , बबन काटकर, मधुकर गिते, दीपक डिगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संदीप पाटील यांचा यशाचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या वडिलांनी दूध विक्रीचा व्यवसाय करून मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत संदीप यांनीही प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या यशामागे संपूर्ण कुटुंबाचा त्याग आणि मेहनत दडलेली आहे.5000सत्कार प्रसंगी बोलताना अशोक नागटिळक यांनी सांगितले की, “संदीप पाटील यांचे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यामुळे कोणतीही उंची गाठता येते. त्यांच्या यशामुळे धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्यभर गौरवाने घेतले जाईल.”

संदीप पाटील यांच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक युवकांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळणार असून, त्यांच्या संघर्षमय यशोगाथेतून नवी पिढी निश्चितच प्रेरणा घेईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button