पुणेमहाराष्ट्रयोजना

अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहायता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत किमान ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी प्रति पात्र बचत गटास रु. ३.१५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.50000

या योजनेसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा पुणे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्व्हे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे-४११००६ येथे स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.5000योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट नोंदणीकृत असणे, गटाच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे, गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे, सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे. पात्र स्वयंसहायता बचत गटांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button